Marathi quotations on life | marathi quotations on success आयुष्यावर मराठी सुविचार

Marathi quotations on life | marathi quotations on success आयुष्यावर मराठी सुविचार

Marathi quotations on life

Marathi quotations on life


नमस्कार,माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो सर्वांच्या आयुष्यात असे अनेक कठीण प्रसंग येतात जेव्हा आपण आपल्या जीवनात हताश होतो.जीवनात येणाऱ्या अडचणींना घाबरून जात असतो,अशा परिस्थितीत Marathi quotations on life किंवा marathi quotations on success आपल्यासाठी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक ठरतील.आयुष्यावर मराठी सुविचार एखाद्याला कठीण परिस्थितीत अडचणींना मात करण्यासाठी मदत करतील आणि तुमचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी उर्जा देतील.

मित्रांनो जेव्हा आयुष्यात नेहमी वळणावळणावर अपयश,पराभव व संकटे येतात तेव्हा त्या परिस्थितीला पाहून ती व्यक्ती आतून पूर्णपणे खचून जाते,तर अशा परिस्थितीत Marathi quotations on life जिवन जगण्याची प्रेरणा देतील.

प्रिय मित्रांनो आज मी आपल्याकरिता मराठी प्रेरणादायक सुविचार,आयुष्यावर मराठी सुविचार,अनमोल सुविचार यांचा संग्रह या आर्टीकल मध्ये केला आहे जे तुम्हाला कठीण परिस्थितीत उर्जा देईल आणि ध्येयाच्या दिशेने पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात.

Life quotations in marathi with images: In this article I have share Marathi quotations on life and marathi quotations on success. you will find all types of marathi quotations.Freinds you can copy and use this quotations on life in marathi for your facebook and whatsapp status.

Friends , I would recommend you that please share Marathi quotations on life,marathi suvichar on life & success quotes in marathi with images to your friends circle with the help of WhatsApp and Facebook.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Marathi quotations on life आयुष्यावर आधारीत मराठी सुविचार

Marathi quotations on life

Marathi quotations on life 


आयुष्य म्हणजे पत्यांचा खेळ.
चांगली पानं मिळणं
आपल्या हातात नसतं.पण,
मिळालेल्या पानांवर
चांगला डाव खेळणं,
यावर आपलं यश
अवलंबून असतं...
💐
असं वाटतं आयुष्य,
इथेच संपून जावं....

तिळतिळ मरण्या पेक्षा,
क्षणात मरण यावं.....

माझ्या या फुटक्या,
नशिबात लिहलेल्या...

सुखाने आयुष्य तिचं,
फुलासारखं फूलावावं..

तिच्या सा-या वेदना,
तिच्या मनातलं सारं दुःख...

माझ्या भाग्यरेषेत,
देवा रेखाटलं जावं...

असं वाटतं आयुष्य,
तिच्या नावे करुन टाकावं..
💐
आपल्या जीवनात येणारा
आपला प्रत्येक क्षण पावसाच्या
एका-एका थेम्बां सारखा आहे..

आपला येणारा क्षण कुठे जाणार?
कसा जाणार?

ह्याचा कुणालाच अंदाज नसतो...
💐
आयुष्य खुप कमी आहे,
ते आनंदाने जगा..!

प्रेम् मधुर आहे,
त्याची चव चाखा..!

क्रोध घातक आहे,
त्याला गाडुन टाका..!

संकटे ही क्षण भंगुर आहेत,
त्यांचा सामना करा..!

आठवणी या चिरंतन आहेत,
त्यांना ह्रदयात साठवून ठेवा..!
💐
आयुष्य थोडच असाव पण आपल्या माणसाला ओढ लावणार असावं,
आयुष्य थोडच जगाव पण जन्मोजन्मीच प्रेम मिळाव,
प्रेम असं द्याव की घेण्याराची ओँजळ अपुरी पडावी,
नाती अशी जपावी की ह्रदयात नित्य प्रेम जागवणारी
💐
आयुष्य पण हॆ एक रांगोळीच आहे.
ती किती ठिपक्यांची काढायची हे नियतीच्या हातात असले तरी तिच्यात कोणते व कसे रंग भरायचे हे आपल्या हातात असते.
💐
आयुष्य सुंदर आहे,जर पहाता आलं..
आयुष्य निर्झर आहे, जर वहाता आलं..
पंचमी श्रावणातली आहे,... जर रंगता आलं.. मदिरा ओठातली आहे,
जर झिंगता आलं..स्वच्छ खुलं आभाळ आहे,जर उडता आलं..
💐
आयुष्याच गणित सोडवतांना,
सांगा काय करायचं....!
चिन्ह तर सगळेच दिसतात,
नेमकं गुणायचं की भागायचं....!!
खरचंच काही वेळा,
गणित अवघड असं येत....!
आपण करतो बेरीज,
नी सार वजा होवून जात....!!
💐
आयुष्याची ङायरी लिहणारा तर तो देव असतो,
पण वाचणारे आपण असतो.
जीवनात खुप काही हव असत,
पण पाहिजे तेच भेटत नसत,
सर्व काही नशीबात असत,
पण आपल नशीब घङवण हे आपल्याच हातात असत..
💐
आयुष्याच्या या वाटेवरती...
असतात संगती सर्व सखे-सोबती..
एके दिवशी जातात सोडून...
अशाच एका वळणावरती....
आयुष्य हे झगडायचे असते..
असेच एकट्याला पार करायचे असते..
आयुष्यात नेहमी जिंकायचं असतं..
अंधारमय जीवन जागायचे नसतं
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Marathi quotes on life जीवनावर मराठी सुविचार

Marathi quotes on life

Marathi quotes on life 


एवढ्याश्या आयुष्यात खुप काही करायचं असतं.
पण हव असतं तेच मिळत नसतं.
हव तेच मिळाल तरी, खुप काही हव असत,
चांदण्यांनी भरूनही आपलं आभाळ रिकामंच असत.....
💐
आयुष्यात काही शिकायच
असेल तर ते पाण्या कडुन
शिकाव..
वाटेतला खड्डा 'टाळुन'
नाही तर ते नेहमी 'भरून'
पुढे जाव..!!
💐
आयुष्यात खुप माणसे भेटतात
वा-याच्या झुळका प्रमाणे येतात आणि जातात पण काही अशी असतात जी मनात जागा घेतात हिच गोड माणसे जिवणाचा अर्थ सांगतात ओठांवर हसु खुलवतात आणी अश्रु ही पुसतात
💐
आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू जिंकायची सवयच आहे . . .
हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहोत
💐
आयुष्यातील आठवणी चित्रात
उतरवता आल्या असत्या..
तर किती बर झालं असतं..
चित्रात स्वतःच
स्वतःला तुझ्याशि कायमच
जोडून घेतल असतं...
आयुष्यात घडलेल्या चुका पुसता तरी आलं असतं...
दूर जाणे इतके दुखावतं तर ...
जड झालेलं आयुष्य हवं
तेव्हा संपवता आलं असतं...
💐
आयुष्यातील एक सत्य--सगळे म्हणतात कि एकटेच आलोय एकटेच जाणार .
पण खर तर दोघांशिवाय कोणी येत नाही
आणि चौघांशिवाय कोणी जात नाही.काय??....खरय ना?
💐
आयुष्यातील ८ मोल्यवान
क्षण....!!!!
.
.
१)आपला पहिला पगार आपल्या आई
वडिलांना देणे...!!!
.
.
२)आपल्या प्रेमाचा विचार
डोळ्यातपाणी आणून करने...!!!
.
.
...
३)जुने फोटो बघून आठवणीत रमून हसणे...!!!
.
.
४)हसत खेळत आणि भावूक गप्पामित्रासोबत­
मारणे...!!!
.
.
५)ज्या व्यक्तीवर आपण
प्रेमकरतोत्या व्यक्तीचा हात प्रेमाने
हातात घेवून चालणे...!!!!
.
.
६)जे आपली मनापासून काळजी करतात
त्यांच्या कडून एक प्रेमळ मिठी मिळवणे...!!!
.
.
७)आपल्या पहिल्या मुलाच्या अथवा
मुलीच्या कपाळावर
चुंबन घेणे जेंव्हा त्याचा जन्म होतो...!!!
.
८)असा क्षण
जेंव्हा कोणी तरी आपल्याला मिठीत घेते
आणि आपल्याला अश्रू आवरत नाही....!!!!
💐
आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात...
फरक एवढाच कि…आरशात सगळे दिसतात,
आणि हृदयात आयुष्यभर आपलेच दिसतात..
💐
एकदा तरी आयुष्यात कुणी असे
भेटावे,
ज्याच्या सोबतितल्या प्रत्येक
क्षणाने सुखवावे,
उन्हात त्याने सावली तर
पावसात थेंब व्हावे,
आणि मायेच्या थेंबानी मी चिंब
भिजून जावे...........
एकदा तरी आयुष्यात कुणी असे
भेटावे,
सूर त्याचा आणि शब्द माझे
असावे......
💐
कधी हसवतात ,
कधी रडवतात
क्षण हे आयुष्याच्या झाडावरुन,
पानांसारखे पडत असतात
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Marathi quotes on Success यशावर आधारित मराठी सुविचार

Marathi quotes on Success

Marathi quotes on Success


किती बरे झाले असते ना
स्वप्नाचे दारचावी लावून
स्वप्न बघता आली असती तर
गोड स्वप्न कधी तुटलीच नसती.
किती बरे झाले असते ना ..
स्वप्नात पाहिजे त्या व्यक्तीला
कधी पण भेटता आले असते तर
एकेकाळी तुटलेली नाती
आयुष्याभराकरता नाही तर
काही क्षणापुरता सांभाळली असती.
💐
चालणारे दोन पाय कीती
विसंगत असतात ,
एक मागे असतो ,
तर एक पुढे असतो ,
पुढच्याला अभिमान नसतो ,
मागच्याला अपमान नसतो ,
कारण त्यांना माहित असत
की क्षणात हे बदलणार ,
याचच नाव जिवन असत ..
💐
जन्मभर जळल्यावर
मेल्यावर पण जाळतात
लाकडापेक्षा माणसंच
लाकडाचे गुणधर्म पाळतात.
💐
जिवणाच्या प्रत्येक वळणावर
आठवण येत राहील ,
एकञ नसलो तरी सुगंध
दरवळत राहील ,
कितीही दूर गेलो तरी
मैञीचे हे नाते ,
आज आहे तसेच उद्या
ही राहील.
💐
जिवन हे एक गाव आहे ,
ज्याच आयुष्य हे एक नाव आहे ,
मातीतच जगुन पुन्हा या मातितच मरायच आहे ,
पण मरणानंतर ही उरेल अस काही तरी करायच आहे
💐
जी माणसं हवीशी वाटतात,ती कधीही भेटत नाहीत.
जी माणसं नकोशी वटतात त्यांचा सहवास संपत नाही.
ज्यांच्याक डे जावेसे वाटते त्यांच्याकडे जायला जमत नाही
जेव्हा जीवन नकोसे वाटते तेव्हा काळ संपत नाही जेव्हा जीवनाचा खरा अर्थ कळतो तेव्हा काळ संपलेला असतो
जीवन हे असंच असत त्याच्याशी जपून वागांव लागतं.
💐
जीवन सुंदर व यशस्वी होण्यासाठी तीन गुणांची जरुरी असते.
पहिला गुण म्हणजे मनात सर्वांविषयी प्रेम पाहिजे.
दुसरा गुण म्हणजे ज्ञान पाहिजे आणि तिसरा गुण म्हणजे काम करण्यासाठी शक्ती पाहिजे विचार ही एक विलक्षण शक्ति असून,
तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे,...म्हणून विचार बदला,..म्हणजे नशीब बदलेल...
💐
जीवनात एवढ्याहि चुका करू नका
कि ..........
पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल
आणि ........
रबराला एवढाही वापरू नका कि
जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल
💐
जीवनामध्ये या 5 गोष्टीँना कधीच तोडु नका...
1) विश्वास
2) वचन
3) नाते
4) मैत्री
5) प्रेम
कारण
या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही..
परंतु वेदना खुप होतात....
💐
जेव्हा मनुष्याकडील धन नष्ठ होते,
तेव्हा वास्तविक त्याचे काहीचनष्ठ होत नाही.
जेव्हा मनुष्याचे आरोग्य बिघडते,तेव्हा त्याचे काहीतरी नष्ठ होते. परंतु,
जेव्हा मनुष्याचे चारित्र्य बदनाम होते तेव्हा त्याचे सर्वस्व नष्ठ होते.
जीवन खूप सुंदर आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Marathi quotations on success यश सुविचार मराठी

Marathi quotations on success

Marathi quotations on success


ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं
उचलता येतं,
त्याला ते विकत घेता येत
नाही आणि ज्याला विकत घेता येतं
त्याला उचलता येत नाही.
.
''विचित्र आहे खरं पण सत्य आहे''.
💐
ठेचा तर लागत राहतीलच
ती पचवायची हिम्मत ठेव
कठीण प्रसंगात साथ देणार्या
माणसांची तु किम्मत ठेव
💐
तुटलेली फुले सुगंध देऊन जातात,गेलेले क्षण आठवणी देऊन जातात,प्रत्येकाचा अंदाज वेगळा आहे,म्हणुन काही क्षणभर.तरकाही आयुष्यभर लक्षात राहतात.
💐
तुम्ही आयुष्यात (या जगात) काय कमावले
याच्यावर कधी गर्व करू नका .. कारण ,
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवून दिले जातात ....
💐
दुखाचे डोंगर कीती जरी कोसऴळे
आयुष्यान पुन्हा सावरायला शिकवल ..
सुखाच पडणार हळुवार चाण्दन
आयुष्यान पुन्हा पहायला शिकवल ..
फुलाच्या वाटेवर प्रितिचा गंध
आयुष्यान पुन्हा घ्यायल शिकवल ..
💐
पंख नाहीत मला पण
उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो..
कमी असलं आयुष्य
तरी भरभरून जगतो..
जोडली नाहीत जास्त नाती
पण आहेत ती मनापासून जपतो...
आपल्या माणसांवर मात्र
मी स्वत:पेक्षा जास्त प्रेमकरतो..
💐
पाकळ्याच गळण म्हणजे फुलाच मरण असत,
मरताणाही सुंगध देण यातच आयुष्य सार असत,
अस आयुष्य जगण म्हणजे खरच सोन असत,
पण या आयुष्यात तुमच्या सारखे स्नेही मिळाले.
तर हे जगण सोन्याहुन पिवळ असत.
💐
फुलपाखरु फक्त 14 दिवस जगतं,
परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने
जगुन कित्येक हदय जिकंत.
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे,
तो आनंदाने जगा आणि
प्रत्येक हदय जिकंत रहा.
💐
माझ्या मते जगावं तर
पावसाच्या थेम्बां सारखा..

पाउस बरसत असतो तेव्हा
तुम्ही कधी पहिला आहे...

त्याचा थेंब अन थेंब
आनंदाने नाचत असतो...

आपण कुठे पडतो आहे
ह्याचा त्याला भानही नसतं
आणि विचारही नसतो...
💐
माहीती नाहि का पण,
जिवनाचा तेढा सुटत नाही
शहाण्या माणसांच शहाणपण
वेडा कधी लुटत नाही
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Life marathi quotation जीवन मराठी सुविचार

Life marathi quotation

Life marathi quotation


मी दुनियेबरोबर "लढु" शकतो
पण "आपल्या माणसांबरोबर" नाही,
कारण "आपल्या माणसांबरोबर"
मला "जिकांयचे" नाही तर जगायचे आहे... !!
💐
वडिलांचे प्रेम रांगोळी आणून देण
आईचे प्रेम रांगोळी काढायला शिकविणे
मुलाचे प्रेम सुंदर पांढरी रांगोळी काढणे
मुलीचे / प्रेयसीचे प्रेम त्या सुंदर रांगोळी मध्ये वेगवेगळे रंग भरणे ♥ ♥ ♥
आता ह्या कवितेमध्ये रांगोळी ह्या शब्दाच्या जागी आयुष्य हा शब्द वापरून पुन्हा वाचा
💐
वेळ हा एखाद्या वाहत्या नदी सारखा असतो.कारण एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही. कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधी पण परत येत नाही. असेच वेळेचे पण आहे. एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही.म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा....
💐
शब्द,पूर आणि डोळे
सगळे शेवटी निमित्तच रे
मरण्याआधी आनंदासाठी
कसे जगायचे?
याचेच निष्फळ प्रयत्न रे
💐
शब्दांविना जगणे म्हणजे
श्वासाशिवायच जगण झाल
चमकणार्या नक्षत्रांनाही
शब्दांनीच तर जीवन दिलं
💐
शहाण्या माणसाच्या आयुष्याचा उत्तरार्ध
त्याने पूर्वार्धात गोळा गोळा केलेले
पूर्वग्रह,
चुकीच्या समजुती आणि चुकांना दुरुस्त करण्यात
व्यग्र असतो.
💐
स्वप्न जिथे साकार होते जीवन तिथेच आकार घेते,
जेव्हा स्वप्नातली कल्पना आणि कल्पनेतील स्वप्ने सत्यात उतरतात,
तेव्हाच जीवन खऱ्या अर्थाने परिपूर्ण होत.
💐
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..
आणि ती असते.. "आपलं आयुष्य"..
म्हणूनच.. ....मनसोक्त जगा !!!
💐
हसण्याची ईच्छा नसली ..तरी हसावे लागते ..
कसे आहे विचारले तर ..मजेत म्हणावे लागते ..
जिवन एक रंगमंच आहे ..ईथे प्रत्येकाला नाटक करावे लागते.
💐
हॄद्याच्या वेदना कधीच संपत नाहीत
खोलवर त्यांचे ठसे उमटलेले दिसतात
काही सुखद घटना अशा घडत असतात
क्षण दोन क्षणासाठी त्या वेदना पुसतात.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

quotations on success in marathi | success quotes in marathi

quotations on success in marathi

quotations on success in marathi


अनुभवाने एक शिकवण
दिली आहे,
कुणाच्या चुका उणिवा
शोधत बसू नका..
नियती बघून घेईल
हिशोब तुम्ही करू नका…
💐

अलेक्झांडरने एक एक करून जग जिंकले,
पण मृत्यू जवळ असताना त्याने इच्छा व्यक्त केली की,
“मेल्यावर मला जमिनीत पुरताना माझे हात बाहेरच ठेवा,
कारण अख्या जगाला कळू दे की,
संपूर्ण जग जिंकणारा जाताना मात्र रिकाम्या हातानेच गेला.
💐
अशा माणसाला कधीच गमावू नका,
ज्याच्या मनात तुमच्याविषयी,
आदर, काळजी आणि प्रेम असेल…
💐
असं काम करा की,
नाव होऊन जाईल..
नाही तर,
असं नाव करा की,
लगेच
काम होऊन जाईल…
💐
आजोबांनी दिलेला एक सल्ला,
सुरुवातीची २० वर्षे परिश्रम करून,
७० वर्षे आयुष्य आनंदात घालवले पाहिजे,
नाहीतर २० वर्षे आनंदात घालवून,
शेवटी ७० वर्षे कठीण परिश्रम करावे लागतात…
💐
आनंदापेक्षाही मोठा असा
एक आनंद आहे..
तो त्यालाच मिळतो,
जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो.
💐
आनंदी राहण्याचा सरळ साधा एकच उपाय आहे,
“अपेक्षा”
स्वत:कडूनच ठेवा समोरच्याकडून नको…
💐
आपण आपल्या
स्वतःबद्दल कधी वाईट
विचार करू नका कारण,
देवाने या कामाचा ठेका
नातेवाईक आणि शेजारच्यांनी
देऊन ठेवलाय…
💐
आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात,
मरतांना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील.
💐
आपले दुःख मोजक्या १% माणसांपाशीच व्यक्त करा,
कारण ५०% लोकांना त्याची काही पर्वा नसते,
आणि ४९% लोकांना तुम्ही अडचणीत आहात याचाच आनंद होतो…

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आयुष्यावर मराठी सुविचार marathi quotation about life 

marathi quotation about life

marathi quotation about life 


आपल्या आयुष्यात,
एखाद्या व्यक्तीला आपली ‘गरज’ बनवू नका…!!
कारण जेव्हा ते बदलतात,
तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीचा राग
कमी पण स्वतःचा जास्त राग येतो…!!
💐
आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,
फुकट मिळालेला वेळ नव्हे,
आयुष्य एक कोडे आहे,
सोडवाल तितके थोडे आहे,
म्हणूनच आयुष्यात येऊन
माणसे मिळवावीत,
एक-मेकांची सुख दुःखे एक-मेकांना कळवावीत…
💐
आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ,
चांगली पाने मिळणे,
आपल्या हातात नसते..
पण मिळालेल्या पानांवर
चांगला डाव खेळणे,
यावर आपले यश अवलंबून असते…
💐
आयुष्यात एकदा तरी,
“वाईट” दिवसांना सामोरे गेल्याशिवाय,
“चांगल्या” दिवसांची किंमत कळत नाही…!
💐
आयुष्यात कोणत्याही मुलीचा
हात धरायला,
हिम्मत लागत नाही..
हिम्मत लागते ती,
तोच हात शेवटपर्यंत
धरून ठेवायला…
💐
आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात,
ते महत्वाचं नाही..
तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत,
याला महत्व आहे…
💐
आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करा, नाहीतर?
दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल”
💐
आयुष्यातला सर्वात मोठा अपराध हाच असतो की,
आपल्यामुळे कुणाच्या तरी डोळ्यात अश्रु असणे,
आणि आयुष्यातले सर्वात मोठे सार्थक हेच की,
आपल्यासाठी कुणाच्या तरी डोळ्यात अश्रु असणे,
अश्रु तेच असतात पण फरक जमीन आसमानचा असतो…
💐
आयुष्यातले काही क्षण हे एकांतात
घालवत जा,
सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील
कारण,
तिथेच आपला संवाद फक्त
आणि
फक्त स्वतःशी होतो…
💐
आयुष्यातल्या असंख्य समस्यांची,
फक्त दोनच कारणे असतात,
एकतर आपण,
विचार न करता कृती करतो,
किंवा कृती करण्याऐवजी,
फक्त विचारच करीत बसतो…

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

marathi quotation on success

marathi quotation on success

marathi quotation on success


इच्छा किती विचित्र गोष्ट आहे,
पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो,
आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो…
💐
ऐकणं महत्वाचं आहेच,
पण त्यापेक्षाही महत्वाचं आहे ते
आचरणात आणणं..
किती ऐकलं यापेक्षा आचरणात
किती उतरवलं, यावरच माणसाचं
यशापयश अवलंबून असतं…
💐
कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो,
पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो,
असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा,
आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या…
💐
कधी कधी संकटे आली की,
२ पावले माघे सरकनेच हिताचे असते,
वाघ २ पावले माघे सरकतो तो माघे हटण्यासाठी नव्हे,
तर पुढे झेप घेण्यासाठी,
जो काळाचा रोख पाहून माघे सरकतो,
तोच काळाच्याही पुढे जाऊ शकतो…
💐
कर्तव्य, कर्ज, उपकार
या ती गोष्टींचं
कधीच विस्मरण
होऊ देऊ नये…
💐
किती दिवसाचे आयुष्य असते,
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावं ते हासून-खेळून,
कारण या जगात उद्या काय होईल,
ते कुणालाच माहित नसते…
💐
कुणाच्याही दुःखाचा
अनादर करू नये..
प्रत्येकजण आपापल्या
संकटांशी झगडत असतो..
काहींना आपल्या वेदना लपवता येतात,
काहींना नाही…
💐
कुणी कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी,
त्रास करून घ्यायचा की नाही
हे आपल्याच हातात असते.
💐
कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून,
त्याच्या भविष्याची टर उडवू नका..
कारण,
काळ इतका ताकदवान आहे कि,
तो एका सामान्य कोळशालाही
हळू हळू हिऱ्यात बदलतो…
💐
कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच आहे,
कौतुक प्रेरणा देते,
तर टीका सुधरण्याची संधी देते…

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Nice quote in marathi | Life quotes in marathi

Nice quote in marathi

Nice quote in marathi 


कोणीतरी बर्फाला विचारले,
आपण एवढे थंड कसे?
बर्फाने अगदी छान उत्तर दिले,
माझा भूतकाळ पण पाणी आणि भविष्यकाळ पण पाणीच!
मग मी गरम कोणत्या गोष्टीवर होऊ?
आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या आणि जीव लावा…
💐
खूप सुंदर प्रश्न आणि त्या प्रश्नाचे उत्तर:
आयुष्य म्हणजे काय?
उत्तर :- माणूस जेव्हा जन्माला येतो,
तेव्हा त्याला “नाव” नसते पण “श्वास” असतो
आणि,
ज्यावेळी तो मरतो तेव्हा फक्त
“नाव” असते पण “श्वास” नसतो.
“नाव” आणि “श्वास” यांच्या मधील अंतर म्हणजेच,
“आयुष्य”!
💐
खोटं बोलणाऱ्या,
फसवणाऱ्या,
व अपमान करणाऱ्या,
लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं
राहिलेलं बरं…
💐
गरजेनुसार जीवन जगा इच्छेनुसार नाही,
कारण गरज तर गरीबांची पूर्ण होते,
इच्छा ही श्रीमंत जरी असला तरी अपूर्णच राहते…
💐
चुकीच्या निर्णयामुळे
आपला अनुभव वाढतो..
आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास…
म्हणून निर्णय बरोबर कि चूक
याचा विचार करायचा नाही,
निर्णय घ्यायचा आणि पुढे जायचं…
💐
छोट्या या आयुष्यात,
खूप काही हवं असतं,
पण पाहिजे तेच मिळत नसतं,
असंख्य चांदण्यांनी भरुन सुद्धा,
आपलं आभाळ मात्र रिकामं असतं…
हव्या असलेल्या सगळ्याच गोष्टी,
माणसाला मिळत नसतात,
पण न मिळणाऱ्या गोष्टीच,
माणसाला का हव्या असतात…?
💐
जग नेहमी म्हणते,
चांगले लोक शोधा आणि,
वाईट लोकांना सोडा..
पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
लोकांमध्ये चांगले शोधा व,
वाईट दुर्लक्षित करा कारण,
कोणीही सर्वगुण संपन्न
जन्माला येत नाही!
💐
जगाला काय आवडते ते करू नका,
तुम्हाला जे वाटते ते करा,
कदाचित उद्या तुमचे वाटणे,
जगाची “आवड” बनेल…
💐
जिंकलेल्या क्षणी हरवलेल्या प्रतिस्पर्ध्याला
कमी लेखणारे भरपूर आहेत…
पण हरलेल्या क्षणी पाठीशी
उभे राहणारे किती…?
यावरून माणसाची श्रीमंती कळते…
तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा..
तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात
याला महत्व आहे!
💐
जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते,
त्यांचा तिरस्कार कधीच करू नका,
कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते…

मोलाचे बोल:
जीवन चहा बनवण्यासारखे आहे..
अहंकाराला उकळू द्या,
चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या,
दुखणं विरघळून जाऊ द्या,
चुकांना गाळून घ्या आणि,
सुखाच्या आनंदाचे घोट हसत हसत घ्या…
💐

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Success quotation in marathi 

Success quotation in marathi

Success quotation in marathi 


जीवनात काहीच
कायमस्वरूपी नसते..
नाही चांगले दिवस,
नाही वाईट दिवस…
💐
जीवनात चांगला माणूस होण्यासाठी,
एवढेच करा…
चुकलं तेव्हा माफी मागा,
आणि कुणी चुकलं तर माफ करा..
आपला दिवस आनंदात जावो…
आणि मन प्रसन्न राहो!
💐
जीवनात तीन प्रकारच्या लोकांना कधीच विसरायचे नाही,
१) ज्यांनी तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळी मदत केली
२) ज्यांनी तुमच्या अडचणीच्या वेळी पळ काढला आणि
३) ज्यांनी तुम्हाला अडचणीत आणले.
💐
जीवनात सुख दुःख दोन्ही
आपण स्वीकारलेच पाहिजेत,
कारण ती आपणच
निर्माण केलेली आहेत..
हे सूत्र लक्षात घेतले तर,
मनुष्य सरळ वागू शकेल…
💐
जेव्हा काही लोक आपली फक्त गरज लागल्यावर आठवण काढतात,
तेव्हा वाईट वाटून घेऊ नका उलट गर्व करा,
कारण एका मेणबत्तीची आठवण फक्त अंधार झाल्यावरच येते..
💐
झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तसं हळू हळू आयुष्य निघून चाललंय…
आणि,
आपण उगीच भ्रमात आहोत कि आपण वर्षा वर्षाने मोठे होत चाललोय,
प्रेम “माणसावर” करा त्याच्या “सवयींवर” नाही,
“नाराज” व्हा त्याच्या बोलण्यावर पण “त्याच्यावर” नाही,
“विसरा” त्याच्या “चुका” पण त्याला नाही,
कारण “माणुसकी” पेक्षा मोठं काहीच नाही…
💐
तुम्ही जसे आहात तसेच
समोरच्या व्यक्तीने असावं,
अशी अपेक्षा करण्यात अर्थ नाही..
कारण एकत्र चालायचे म्हणून,
तुम्ही कधीच दुसऱ्या व्यक्तीचा
उजवा हात तुमच्या उजव्या हातात
घेऊ शकत नाही…
💐
प्रेम आणि विश्वास, कधिच गमावु नका..
कारण,
“प्रेम प्रत्येकावर करता येत नाही..”
आणि,
“विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही..”
💐
प्रेमळ माणसं ही,
इंजेक्शन सारखी असतात,
ते तुम्हाला कधी वेदना देतीलही,
पण उद्देश तुमची
काळजी घेणं हाच असतो…
💐
फुलपाखरु फ़क्त १४ दिवस जगते,
पण ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक ह्रदय जिंकते,
आयुष्यात प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे,
तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा…
💐
“लक” – या शब्दात दोन अक्षरे आहेत,
“भाग्य” – या शब्दात अडीच अक्षरे आहेत,
“नशीब” – या शब्दात तीन अक्षरे आहेत,
“किस्मत”- या शब्दात साडेतीन अक्षरे आहेत,
पण हे चारही शब्द,
“मेहनत”
या शब्दांपेक्षाही लहान आहेत…

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Tips :- प्रिय मित्रांनो जर तुमच्या जवळ marathi thoughts,marathi suvichar,marathi Quotes,suvichar in marathi, marathi quotations असतील तर comments मधे जरुर लिहा.आम्ही नक्की येणाऱ्या लेखात तुमचे मराठी सुविचार Update करू

Please Support :- आम्हाला खात्री आहे की Marathi quotations on life,marathi quotations on success with images,मराठी सुविचार ,मराठी प्रेरणादायक सुविचार,तुम्हाला नक्की आवडले असेलच..तर मग आपल्या मित्र- मैत्रिणीला whatsapp and Facebook वर share करायला विसरु नका.

मित्रांनो लक्षात ठेवा की जर का तुम्ही कोणत्याही प्रकारचे Marathi Thoughts इतरांसोबत शेअर करू इच्छित असाल तर तुम्ही आमच्या www.marathithought.com वर दररोज भेट द्या.तुमच्याजवळ स्वताचे marathi thought असतिल तर आम्हाला पाठवा आम्ही तुमचे विचार आमच्या या वेबसाईट च्या द्वारे लाखों लोकांपर्यंत पोचवू.

I have tried for provide Marathi quotes on life and love,good thoughts in marathi on life,life quotations in marathi,marathi suvichar,marathi quotations on success with images.

Please don't forget to share.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा

Post a Comment (0)

थोडे नवीन जरा जुने